'सोमेश्वर'ने एफआरपी वरील व्याज व पंधरवडा उस बीलातुन बेकायदेशीर कपात केलेल्या रक्कमा तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग कराव्यात : सतिश काकडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
प्रथमतः चालु गळीत हंगामाची F.R.P सोमेश्वरच्या संचालक मंडळाने बोलल्याप्रमाणे एक रक्कमी दिल्यामुळे त्यांचे अभिनंदन ! परंतु चालु हंगामातील उस बीलाची माहिती घेतली असता पंधरवडा उस बीलासोबत F.R.P विलंबाने दिल्यामुळे त्याचे व्याज आपण दिले नाही. मात्र संचालक मंडळाच्या मिटींमध्ये व्याज देणे बाबत चर्चा व निर्णय झाला होता. मग चेअरमन यांनी निर्णय का बदलला याचा खुलासा करावा. संचालक मंडळाने व्याजाचा विषय ताणुन धरू नये सभासदांच्या उस बील व तोडणी बाबतच्या तकारी कृती समितीकडे येवु नयेत याची दक्षता घ्यावी. व तात्काळ पुढील पंधरवडयात व्याजाची रक्कम वर्ग करावी व पुढील होणारे पंधरवडा पेमेंट वेळेत द्यावे.
         चालु हंगामातील माझे उस बीलाची रक्कम पाहता उसबीलातुन आपण शेअर्स रक्कम कपात केल्याचे दिसते. तसेच अनेक सभासदांनी उसबीलातुन शेअर्स पोटी रक्कम कपात केल्याची तकार कृती समितीकडे केली आहे. तरी कायद्याप्रमाणे F.R.P रक्कमेतुन कोणतीही कपात करता येत नाही. त्यामुळे चेअरमन व संचालक मंडळाला अवाहन व विनंती करण्यात येत आहे की चालु गळीत हंगामाच्या F.R.P मधुन शेअर्स पोटी कपात केलेल्या रक्कमा सभासदांच्या बँक खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात याव्यात तसेच सर्व सभासदांना अवाहन करण्यात येते की कारखान्याच्या कपाती बाबतच्या कोणत्याही संमती पत्रावर सहया करू नये. तसेच कारखान्याने चालु गळीत हंगामाची F.R.P विलंबाने दिल्यामुळे त्याचे व्याज व चालु गळीत हंगामातील उस बीलात बेकायदेशीर कपात केले बाबत लेखी तकार कारखाना व साखर आयुक्त कार्यालयात कृती समितीने केली आहे. त्याची प्रत सोबत जोडत आहे. संचालक मंडळ वेगवेगळया माध्यमातुन सभासदांच्या उस बीलातुन लेखी संमती नसताना कपाती करत आहे ते पुर्णपणे बेकायदेशीर आहे. का कारखान्याकडे विस्तारवाढ करण्यास पैसे नाहीत? का कारखाना कर्जबाजारी आहे? याचा खुलासा तरी करा. तसेच मागील ३ वर्षापुर्वी गाळप झालेल्या उस बीलातुन २० कोटी रूपये किंमत चढ उतार निधी सभासदांच्या उस बीलातुन राखुन ठेवलेल्या पैशाचे काय झाले? व मागील हंगामात दिवाळीपूर्वी सभासदांच्या (फायनल पेमेंटच्या) उस बीलातुन कपात केलेल्या प्रति मे. टन २०० रू प्रमाणे अंदाजे २४ कोटी रूपये कपात केले या पैशाचे काय ? चेअरमन व M.D म्हणतात अजुन को-जन व डिस्टलरीचे विस्तारीकरण करायचे आहे. मग चेअरमन आपण हे पैसे कोठुन आणणार आहात? का परत काहीतरी सबब सांगुन सभासदांच्या उस बीलातुन परत कपात करणार? चेअरमन साहेब पैशांची तरतुद नसल्यास को-जन व डिस्टलरीचे विस्तारीकरण काही वर्ष थांबवा हट्ट धरू नका नाहीतर अजुन कर्ज काढुन आम्हा सर्व सभासदांना भिकेला लावाल कुपया याचा निट विचार करा.
     तसेच कारखाना वारंवार सभसदांच्या उस बीलातुन पैसे कपात करू लागला तर सभासदांना जिल्हा बँकेच्या घेतलेल्या ५लाख रू कर्जावारील व्याज सवलत कशी मिळणार? कारखाना हा सभासदांचा आहे. कुणाच्या वैयक्तीक मालकीचा नाही. संचालक मंडळाने चालविलेल्या बेकायदेशीर गोष्टी सभासद व शेतकरी कृती समिती कधीही सहन करणार नाही.
              तरी चेअरमन व संचालक मंडळास विनंती आहे की तात्काळ सभासदांच्या खात्यावर F.R.P वरील व्याज व शेअर्सपोटी बेकायदेशीर कपात केलेल्या रक्कमा तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करव्यात असे अवाहन कती समिती करीत आहे. तसेच याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास साखर आयुक्त सो यांचेकडे दाद मागण्यात येईल व वेळ पडल्यास अजितदादांच्या कानावर घालुन हायकोर्टातही दाद मागण्यात येईल.
To Top