सोमेश्वर रिपोर्टर टीम- - - - -
सोमेश्वरनगर दि २
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत करंजेपुल दुरक्षेत्र हददीतील करजे गावात गेल्या काही दिवसापासुन विहिरीचे विदयुत पंप चोरी होत असल्याची तक्रारी प्राप्त होत होत्या त्याबाबत १ ) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. ४८४ / २०२१ भादवि ३७ ९ , २ ) गु.र.न. ४८५/२०२१ भादवि ३७ ९ , प्रमाणे गुन्हा दाखल होता .
त्याअनुशंगाने करंजेपुल दुरक्षेत्राचा स्टाफ विदयुत पंप चोरटयांचा शोध घेत होता . त्यावेळी सागर सतिश पाटोळे रा करंजे ता बारामती हा त्याचे साथीदारासह विदयुत पंप चोरी करत असल्याची माहीती मिळाली होती . त्यावरून सागर पाटोळे यास ताब्यात घेतले , व त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार शेखर सतिश पाटोळे , मयुर नंदकुमार गायकवाड , अल्पवयीन मुलगा सर्व रा करंजे ता बारामती यांचेसह करंजे परिसरात १० विदयुत पंप चोरल्याची कबुली दिली आहे . पोलीसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेकडुन १० पैकी ७ विदयुत पंप मोटारी हस्तगत केल्या असुन , उर्वरित ३ मोटारीचा शोध घेत आहे .
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मा . डॉ . अभिनव देशमुख सो पुणे ग्रामीण पोलीस , अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते सो . बारामती विभाग बारामती , तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे सो बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी सहा . पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे , पोलीस उपनिरीक्षक गणेश कवितके , पोहवा डी . एस . वारूळे , पोहवा आर . एल नागटिळक , पोहवा एन . के . खेडकर , पोना नितीन बोराडे , पोना सागर देशमाने , पोशि महादेव साळुंखे , पोशि अमोल भुजबळ यांनी केली .