पुरंदर ! नीरा रेल्वे स्टेशनला मुंबईचा चिमुकला चुकून उतरला : नाव इरान अदान सय्यद...वडील जुहू चौपाटीवर रिक्षा चालवतात ...तर मामा कल्याणला भाजी विकतो

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- 
नीरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील नीरा गावात एक ८ ते १० वय वर्षांचा मुलगा फिरताना आढळून आला आहे. तो कोयना एक्सप्रेस मधुन उतरला आणि मी हरवलो आहे. तो मुंबई येथून आला असल्याचे सांगत असुन, मामा कल्याण येथे भाजी पाल्याचा व्यावसाय करत असल्याचे तो सांगत आहे. आता हा मुलग निरा पोलीस दुरक्षेत्रात असुन कोणाला ओळखू आल्यास निरा पोलीस दुरक्षेत्रात संपर्क करवा असे आव्हाण निरा पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरिक्षक कैलास गोतपागर (मो. 9960019926) यांनी केले आहे. 
निरा पोलीस ठाणे, ता. पुरंदर जि. पुणे. 412102 आज दिनांक 30/12/2021 रोजी सायंकाळी 16:30 वाजे दरम्यान निरा पोलीस ठाणे हद्दीत एक लहान मुलगा वय अंदाजे वय 8 ते 10 वर्षे वयाचा मिळून आला आहे. त्याला तेथील स्थानिक नागरिक नामे स्वप्नील जगदाळे व पो. ह.मोकासे यांनी विचारपुस केले असता तो हिंदी बोलतो व त्याचे नाव इरान अदान सय्यद असे सांगतो आहे पत्ता सांगता येत नाही जुहू चौपाटीवर वडील रिक्षा चालवतात असे सांगतो. तरी सदरील मिळून आलेल्या मुलाचे बाबत कुठे हरविले / अपहरित बाबत तक्रार नोंद असल्यास त्यांनी/पालक/ नातेवाईकांची/ ओळखीच्यालोकांची माहिती मिळाल्यास तात्काळ नमुद पोलीस ठाणेस संपर्क साधा..
मो. 7020029899
To Top