सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर शहराच्या विकासासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातुन व जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या पाठपुराव्याने मागील चार महिन्यांपूर्वी १ कोटी ५० लक्ष निधीची कामे मंजूर झालेला आहे. नगरपालिका सदर नगर विकास कामे मार्गी लावन्यास विलंब करीत आहे तर विकास कामे थांबवली असल्याने भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते पुढील आठ दिवसात नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन छेडणार असल्याचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी सांगितले.
नगरपालिकेचे बेकायदेशीर व निष्क्रिय कामकाज सुरू आहे.यावर नगरपालिका प्रशासन कारवाई करीत नाही. वेळोवेळी निवेदनाची माहिती दिली जात नाही तर कारवाई केली जात नाही या आणि अन्य कारणांमुळे आंदोलन छेडण्यात येणार आहे असेही शिंदे यांनी सांगितले.यावेळी मा.गटनेते यशवंत डाळ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष सुहित जाधव,महिला अध्यक्ष हसीना शेख,मा.युवकाअध्यक्ष प्रशांत जाधव,युवक शहराध्यक्ष कुणाल धुमाळ,ज्येष्ठ नेते भाई रावळ,एकनाथ रोमन,किरण अंबिके,.बाळू खुटवड, जाकिर भाई भालदार,.पोपट तारू,श्री राजेश शिंदे,बाळासाहेब शेटे,मयूर भिसे,विक्रम शिंदे,सनी साळुंखे, राम घोणे,अतिश वाडकर,गणेश भिलारे उपस्थित होते.
-------------------
नवीन विकास कामांसाठी प्रशासकीय मान्यता घेणे बाकी आहे.लवकरच प्रशासकीय मान्यता घेऊन कामे सुरू केले जाईल असे नगरपालिकेचे नगरविकास अधिकारी अभिजित सोनवणे यांनी सांगितले.
COMMENTS