सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
महाराष्ट्रासह भोर एसटी बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ७ नोव्हेंबर पासून संप पुकारला होता.यामुळे एक महिनाभर एसटी बस सेवा बंद होती. मंगळवारी दि.७ वाहतूक विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी पुढाकार घेऊन भोरमधील एसटी कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतली. ही बैठक सकारात्मक झाल्याने दुपारी ३ नंतर एसटी बस सेवा सुरू करण्यात आली.
महुडे, शिरवळ, चिखलगाव, जोगवडी, कापूरहोळ या ठिकाणासाठी भोर आगारातुन पाच एसटी बस रवाना झाल्या. एक महिनाभर एसटी बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे व प्रवाशांचे अतोनात हाल होत होते एसटी बस सेवा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी व प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.