सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चालु गळीत हंगामाकरीता ऊसाची एकरकमी एफआरपी अदा करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाला असल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने आजअखेर २,४९,४,९४ मे. टनाचे गाळप केले असुन सरासरी १०.६३ टक्के साखर उतारा राखीत २,६३,५०० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत दि.१५/११ अखेर पर्यंत गाळ्पास आलेल्या सुमारे १,३८,६०० मे.टन ऊसाचे एफआरपी प्रती मेट्रीक टन २८६७ रुपयांप्रमाणे एकुण होणारी ३९ कोटी ७३ लाख रुपये रक्कम १० डिसेंबरपर्यंत वर्ग करणार असल्याचे श्री. जगताप म्हणाले. अदा होणारी एकरक्कमी एफआरपी ही संपुर्ण पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च असल्याचेही श्री. जगताप म्हणाले.
जगताप पुढे म्हणाले की, उशिरा दिल्या जाणा-या एफआरपी पेमेंटचे व्याजाचे पैशाची उपलब्धता होताच सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करणार आहोत. प्रमाण यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन आनंदकुमार होळकर सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव उपस्थित होते.
COMMENTS