पुणे
अनाथ मुलांसाठी आयुष्य वेचणा-या पद्मश्री पुरस्कारप्राप्त, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांचे पुण्यात दीर्घ आजाराने आज निधन झाले.
त्या अनेक दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. सिंधूताई यांचे मांजरी येथील पुनर्वसन केंद्रात अनेक अनाथ मुले राहत आहेत. त्यांच्या जाण्याने या अनाथ मुले पोरकी झाली आहेत. सिंधूताई या माई नावाने परिचित होत्या.