महत्त्वाची बातमी ! वाहन मालकांनी ना हरकत प्रमाणपत्राची सत्यता पडताळावी : आरटीओ बारामती

Pune Reporter
2 minute read


बारामती, दि. ५

 वाहनावरील कर्जबोज्याची नोंद उतरविताना वित्तदात्याकडून वाहनमालकास नमुना क्र.35 व ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येते. परंतु अशा प्रकारे वित्तदात्याकडून जारी केले जाणारे नमुना क्र. 35 व ना-हरकत प्रमाणपत्र हे बनावट असल्याचे काही प्रकरणात निदर्शनास आले आहे.

 त्यामुळे वाहन मालकांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या mh42hptr@gmail.com या ईमेल आयडीवरून सत्यता पडताळणीसाठी ईमेल केला जाईल. या ईमेलला 7 दिवसात उत्तार द्यावे. मुदतीत उत्तवर न आल्यास सादर केलेले नमुना क्र. 35 व ना-हरकत प्रमाणपत्र हे वाहनमालकाकडूनच जारी झाल्याचे समजण्यात येईल व वाहनावरील कर्जबोज्याची नोंद उतरविण्यात येईल.

सर्व वाहन मालकांनी ना हरकत प्रमाणपत्राची पडताळणी ईमेलवर करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार पाटील यांनी केले आहे.

To Top