सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अश्लील शब्दात पोस्ट केल्याप्रकरणी हिरो राजा बाबू या ट्विटर अकाऊंट वर वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत नितीन संजय यादव वय 30 वर्षे व्यवसाय नोकरी रा करंजेपूल ता बारामती जि पुणे यांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी हिरो राजा बाबू या twitter अकाउंट धारक 2) Ajju Dixit संपुर्ण नाव पत्ता माहीत नाही यांचेवर गुन्हा दाखल केला आहे.
बाबपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील आरोपीत यांनी twitter व फेसबुक वरील देशी हिरो राजा बाबु http twitter.com@/ babu 75171340 या टिवटर अकाउंट वरून Replying to @GawaiSpeeks and @Awhadspeaks या लिंकद्ववारे महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री श्री जितेंद्र आव्हाड यांचेबाबत अश्लील शब्दाची पोस्ट twitter व फेसबुक या समाज माध्यमाद्वारे नमूद अश्लील शब्द हे महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचेबाबत अब्रुनुकसानकारक आहेत हे माहित असतांना त्यांनी व्टीटर व फेसबुक अकांउट वरून अश्लील व बदनामीकारक शब्द/मजकुर twitter व Facebookया सामाजिक /सार्वजनिक माध्यमांवर सार्वजनिक रित्या प्रसिध्द केलेने फिर्यादी यांनी वरील मजकुराचे फिर्यादी वरुन गुन्हा रजि दाखल करुन दाखल गुन्ह्याचा प्रथम वर्दी रिपोर्ट मा.हु.कोर्टास रवाना करुन गुन्ह्याचा पुढील तपास पोसई शेलार सो हे करीत आहेत.