भोर ! कोरोनाचा तिनशेचा आकडा पार : आठवडे बाजार बंदच राहणार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला असून तिसऱ्या लाटेतील कोरोनाने हद्द पार करून चक्क ३११ वर रुग्ण संख्या गेली आहे.रुग्ण संख्या वाढू नये याकरिता मंगळवार दि-१८ चा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.
          कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असून दिवसाला साधारणपणे २५ ते ३० चा आकडा रुग्ण पार करीत आहेत. देशासह राज्यात,जिह्यात तसेच भोर तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे. नागरिक बेजबाबदारपणे वागत असून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत.त्यामुळे गर्दी होऊन रुग्ण संख्या वाढू लागली आहे.मागील मंगळवारी आठवडे बाजार बंद असल्याचे व्यापाऱ्यांना सांगण्यात आले होते.मात्र बाहेरील तालुक्यातील व्यापाऱ्यांना माहिती मिळाली नसल्याने सवलत देण्यात आली होती.मात्र या मंगळवारी सवलत न देता जे व्यापारी बाजारपेठेत भाजी विक्रीसाठी बसतील त्या व्यापाऱ्यांकडून दंड वसूल केला जाईल असे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी सांगितले.

To Top