सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघातील सर्व सदस्यांची पत्रकारीता राज्यात दिशादर्शक असुन केवळ पत्रकारीता न करता खऱ्या अर्थाने सामाजीक बांधीलकी ते जपत आहेत .लोकमान्य टिळक, बाळशास्त्री जांभेकर याना अभिप्रेत पत्रकारीता तालुक्याच्या ग्रामीण भागात असल्याने समाजीक क्रांती झाली आहे असे मत पुणे जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित संचालक संभाजी होळकर यानी सोमेश्वरनगर येथे व्यक्त केले .
पत्रकार दिनानिमित्त बारामतीच्या जाणीव प्रतिष्ठान तर्फे बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघातील सदस्याना मानचिन्ह व सन्मानपत्र देवुन गौरविण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखाना उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर होते. तर वडगाव निंबाळकर चे स पो नि सोमनाथ लांडे ,बारामती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज खोमणे व सोमेश्वर चे संचालक प्रवीण कांबळे, सोमेश्वर शिक्षण संकुल सचीव भारत खोमणे आदी मान्यवर यावेळी उपस्थीत होते .
यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .कार्यक्रमाच्या प्रास्तावीकामधे पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मोरे यानी जाणीव प्रतिष्ठान च्या कार्याबद्दल माहीती दिली .
पत्रकारांच्या वतीने ॲड .गणेश आळंदीकर यानी पत्रकारीतेतील बदल व नवनवीन आव्हाने याबाबत माहीती देवुन पत्रकारानी काळाबरोबर स्वत:मधे केलेल्या बदलाबद्दल तसेच देशभरात गाजलेली प्रकरणे प्रामाणीक हाताळल्याबद्द्ल बारामती तालुका ग्रामीण पत्रकारांचे कौतुक केले .
संभाजी होळकर पुढे म्हणाले बारामती तालुक्यातील ग्रामीण पत्रकार केवळ पत्रकारिता करीत नसुन सामाजीक कार्यकर्त्याचे काम करतात .डॉ .मनोज खोमणे व वडगाव निबाळकर चे स पो.नी सोमनाथ लांडे यांचा यावेळी कोव्हीड काळात केलेल्या कार्याबद्दल मानचिन्ह व मानपत्र देवुन गौरव करण्यात आला. डॉ खोमणे सत्काराला उत्तर देताना म्हणाले आमच्या कार्याला पत्रकारानी प्रोत्साहन दिल्याने जबाबदारीचे ओझे वाढले असुन १० जानेवारी पासुन ६० वर्षावरील जेष्ठाना बुस्टर डोस देणार असुन तिसऱ्या लाटेला देखील शासनाचे नियम पाळुन आपण एकजुटीने सामोरे जावु असे सांगीतले.स पो नि सोमनाथ लांडे यानी पत्रकारांच्या कार्याचे कौतुक करुन अनेकदा गुन्हयाची उकल करताना व सामाजीक कार्य करताना बारामती तालुक्यातील ग्रामीण पत्रकारांची आपल्याला मोठी साथ मिळाल्याने आपण चांगले काम करु शकलो असे सांगीतले .
आनंदकुमार होळकर यानी ऊसाचे वाढते क्षेत्र चिंता करणारी बाब असुन कारखान्याद्वारे जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचा प्रयत्न केला जाईल मात्र शेतकरी वर्गाने ईतर पिकाकडे पण वळले पाहीजे असे सांगीतले.
पत्रकार संतोष शेंडकर यानी सुत्रसंचालन व स्वागत केले तर आभार पत्रकार चिंतामणी क्षीरसागर यानी मानले .
यावेळी जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे ,जयराम सुपेकर ,अशोक वेदपाठक, गणेश आळंदीकर, महेश जगताप युवराज खोमणे ,तुषार धुमाळ ,हेमंत गडकरी, सचीन वाघ ,कल्याण पाचांगणे ,अनिल धुमाळ ,अमर वाघ ,सचीन पवार ,दिपक जाधव ,सुदाम नेवसे ,युवराज खोमणे ,गजानन हगवणे, समीर बनकर, युवराज इंदलकर, यांच्यासह सुमारे ४० पत्रकार हजर होते.
सूत्रसंचालन संतोष शेंडकर यांनी केले तर आभार चिंतामणी क्षीरसागर यांनी मानले.