सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
भोर : प्रतिनिधी
भोर शहरात तसेच तालुक्यातील वाहतुकीच्या महत्वाच्या रस्त्यावर दुचाकी वाहनावर परवानगी नसतानाही ३ ते ४ व्यक्ती बसणे,दुचाकी गाडी वेगाने चालवून कर्कश आवाजाचे हॉर्न वाजविणे, रस्त्यात दुचाकी गाडी उभी करून गप्पा मारणे या आणि अन्य कारणांनी भोर शहरात रोदरोमिओंनी उच्छाद मांडला आहे. मात्र या रोदरोमिओंच्या उच्छादाकडे ट्राफिक पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याने विध्यार्थी व पादचारी नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून विध्यार्थी व नागरिक हैराण झाले आहेत.
भोर शहरासह तालुक्यातील दुचाकी व चारचाकी चालवणाऱ्या तरुणाईला पोलिसांचा धाकच उरला नसल्याने तरुणाई बेभान होऊन वाहने चालवीत आहेत.या बेभान वाहांचालकांमुळे शहरातील बाजारपेठेत ये-जा करणाऱ्या नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे.भोर ट्राफिक पोलीसांनी लवकरात लवकर विध्यार्थी व पादचारी नागरिकांच्या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे असून बेभान रोदरोमिओंचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.