संत ज्ञानेश्वर विद्यालय मुलांचे शासकीय वसतीगृह तात्पुरते कारागृह म्हणून अधिग्रहीत

Pune Reporter


            पुणेदि. २४:- 

कोवीड-१९ चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून पोलीस ताबा व नव्याने दाखल होणारे परंतू लक्षणे नसलेले कोरोनाबाधित बंदी तसेच कारागृहातील यादृच्छिकपणे चाचणीमध्ये कोरोनाबाधित आढळून येणाऱ्या बंद्याकरीता विश्रांतवाडी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय मुलांचे शासकीय वसतीगृह युनिट-९ हे कोविड काळजी केंद्र म्हणून बंद्यांना ठेण्याकरीता तात्पुरत्या कारागृहासाठी  म्हणून पुढील आदेशापर्यंत अधिग्रहीत करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

 

            पुणे शहर पोलीस आयुक्त यांना तात्पुरते कारागृहाच्या ठिकाणी सुरक्षितेच्यादृष्टीने संपुर्ण इमारतीच्या चारही बाजूने आवश्यक तो पोलीस बंदोबस्त चोवीस तास व त्या परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त पुरविण्याचे तसेच अधीक्षक येरवडा मध्यवती कारागृह यांनी तात्पुरत्या कारागृहाच्या  दैनंदिन कामकाजासाठी एक तुरुंगाधिकारी व एक लिपीक किंवा रक्षक यांची नियुक्ती करावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

To Top