सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाकी-चोपडज ओढ्यावरील पूल लहान असल्याने दरवर्षी पावसाळ्यात ओढ्याला पूर आला की चोपडज गावाचे हाल व्हायचे. ही समस्या कायमस्वरूपी संपणार आहे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे ओढ्यावरील दोन पुलांना चार कोटी रूपये निधी प्राप्त झाला आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते पुलाचा भूमिपूजन समारंभ पार पडला.
ओढ्यास पूर आला तरी वाकी बाजूने चोपडज गावात ओढ्यावरून येणारा आणि नीरा-बारामती मार्ग ते चोपडज हा ओढ्यावरूनच येणारा रस्ता बंद होतो. आता ओढ्यावरील दोन्ही पुलांसाठी प्रत्येकी दोन कोटी रूपायंचा निधी प्राप्त झाला आहे. आता दोन्ही पूल दुप्पट उंचीचे होतील अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर एम मुखेकर यांनी दिली.
या पुलांचे भूमिपूजन होळकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सरपंच पुष्पलता जगताप, पंचायत समिती सदस्य बापूराव धापटे, प्रा. बाळासाहेब जगताप, सुनिल खलाटे, उपसरपंच तुकाराम भंडलकर, संजय गाडेकर, बबन निकम, हनुमंत साळुंके, आर. एन. भंडलकर, भालचंद्र भोसले, रवींद्र जगताप, देविदास जगताप व सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी सरपंच पुष्पलता जगताप यांनी, 'अजितदादांच्या भरीव सहकार्यामुळे गावात अटल भूजल व सीटी सर्वे योजनांमध्ये सहभाग घेतल्याचे तसेच एक चांगला ग्रामसेवक पंचायत समितीच्या माध्यमातून द्यावा असे सांगितले.
तसेच वाकी ते चोपडज ते नीरा-बारामती मार्ग या चार किलोमीटर रस्त्याचे कामही मंजूर झाले असून लवकरच सुरू होईल माहिती संभाजी होळकर यांनी दिली.
-