सोमेश्वर रिपोर्टर टीम
बारामती दि ३
ओमिक्रॉन चा जगात मोठ्या प्रमाणावरती संसर्ग होत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील मुलाचे लसीकरण करण्याबाबत स्वागतार्ह निर्णय घेतला. त्या अनुषंगाने बारामती तालुक्यामध्ये पहिल्या दिवशी २ हजार २० विद्यार्थ्यांचे लसीकरणाची पहिली मात्रा देण्यात अाली अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली आहे .
बारामती तालुक्यामध्ये जवळपास २२ ते २३ हजार संस्थात्मक शालेय विद्यार्थी असून संस्थेच्या डोअर टू डोअर लसीकरणाला प्राधान्य देणार असल्याची माहिती डॉ.खोमणे यांनी दिली