पुरंदर ! सासवड येथील 'त्या' महिलेचा गळा दाबूनच खून : पोलिसात गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सासवड : प्रतिनिधी 
सासवड पोलिस स्टेशनच्या अंतर्गत असणाऱ्या शेटेमळा या ठिकाणी अज्ञात महिलेचा मृतदेहा संदर्भात सासवड पोलीस स्टेशनला माहिती मिळाली होती. त्यानुसार दिनांक 16 जानेवारी 2022 रोजी सकाळी दहा पूर्वी घडलेल्या घटनेतील त्या महिलेचा गळा आवळून खुन केल्या संदर्भात सासवड पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपी विरोधात सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनायक झिंजुर्के यांनी गुन्हा दाखल केला आहे. 
यासंदर्भात मात्र दोन दिवसा पासून मृत महिलेची ओळख पटलेली नाही. सासवड पोलिसांसमोर या मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
       सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे वर्णन एक स्त्री जातीचे प्रेत वय अंदाजे 40 ते 45 वर्षे, प्रेत पश्चीमेस डोके व पूर्वेस पाय असे उताण्या स्थितीत पडलेले. उंची अंदाजे 5 फूट 3 इंच,वर्ण-सावळा,अंगात फिक्कट भगवा रंगाचा सलवार कुर्ता, आबोली रंगाची पँन्ट,गुलाबी रंगाचे चैनचे जॅकेट.गळयाभोवती गुलाबी रंगेबीरंगी ओढणी. कपाळास लहान आकाराची टिकली, नाकात लहान आकाराची चमकी,कानात बाळया. कपडयांना विविध ठिकाणी लांडगा या वनस्पतीचे काटे चिकटलेले होते. उजव्या हाताच्या करंगळी शेजारच्या बोटात पंचधातूंची अंगठी, त्याच हाताला आतील बाजूस इंग्रजीत ळ.ट व त्याखाली ‘संजु वंदना जाधव.’ असे मराठित नाव गोदलेले,हाताचे बाहेरील बाजूस मोरपंख व इंगजीत । गोदलेले होते. डाव्या हातास दोन धागे, हाताचे अंगठया शेजारील व करंगळी शेजारील बोटात पिवळया धातूची अंगठी,हाताचे मागील बाजूस इंग्रजीत आई,बाबा असे गोंदलेले, व बाजूस तुळस व बदामामध्ये ट. असे गोंदलेले दिसत होते.
        हकीगत दि. 16/01/2022 रोजी सकाळी 10.00 वा. चे पूर्वी नक्की तारीख वेळ माहित नाही मौजे शेटेमळा,सासवड ता पुरंदर जि पुणे येथे श्री.रमेश आनंद जगताप यांचे शेतजमीन गट नं. 457 मधील ज्वारीचे पिकात अनोळखी महिला वय अंदाजे 40 ते 45 वर्षे  हिचा कोणीतरी अज्ञात कारणावरून गळा आवळून खून केला आहे म्हणून माझी अज्ञात आरोपी विरूध्द फिर्याद आहे. पुढील तपास सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करीत आहेत.
To Top