राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची नियुक्ती

Pune Reporter
मुंबई, दि.२६ : 
महाराष्ट्र राज्य  महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची  नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये ॲड. गौरी नारायणदास छाब्रीया, ॲड. संगीता चव्हाण, सुप्रदा फातर्पेकर, दीपिका संजय चव्हाण, आभा विजयकुमार पांडे, उत्कर्षा रुपवते या सहा जणींची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  महाराष्ट्र  शासनाच्या राजपत्रात याबाबत २५ जानेवारी २०२२ रोजी अधिसूचना प्रसिध्द झाली असून अधिसूचना प्रसिध्दी दिनांकापासून ही नियुक्ती तीन वर्षे कालावधीकरिता आहे.
To Top