सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगांव निंबाळकर : प्रतिनिधी
ग्रामपंचायत वडगाव-निंबाळकर व सेंटर फॉर ई-गव्हर्नन्स ट्रेनिंग अँड रिसर्च, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव निंबाळकर परिसरातील नागरिकांना शासकीय शुल्कामध्ये वाहन परवाना या सेवेचा लाभ घेता यावा याकरिता दि. ८ व ९ जानेवारी २०२२ रोजी वाहन परवाना शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांना शासकीय शुल्कामध्ये दुचाकी व चारचाकी (हलकी वाहने) याकरिताचे ड्रायव्हिंग लायसेन्स काढून मिळणार आहे, विनाशुल्क रस्ते वाहतूक सुरक्षा नियमांचे प्रशिक्षण, ऑनलाईन व्हिडीओच्या माध्यमातून, मोबाईलद्वारे लर्निंग लायसेन्स सराव परीक्षेचे प्रशिक्षण, मोबाईलद्वारे लर्निंग लायसेन्स मुख्य परीक्षेचे ट्रेनिंग, मोबाईलद्वारे लर्निंग लायसेन्स डाऊनलोड करण्याचे ट्रेनिंग दिले जाणार आहे. शिबिरामधे सहभागी होऊन वाहन परवाना शिबिरासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांचा वाहन परवाना मिळेपर्यंत संस्थेमार्फत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. त्यासाठी नागरिकांना शासकीय फी व्यतिरिक्त ज्यादा पैसे खर्च करण्याची गरज नाही. वाहन परवाना काढण्यासाठी नागरिकांनी पुढील आवश्यक कागदपत्रे शिबिरासाठी येताना घेऊन यायची आहेत.
पत्त्याच्या पुराव्यासाठी( कोणतेही दोन )
आधार कार्ड
वीजबिल,
मतदानओळखपत्र,
पासपोर्ट,
एलआयसी पॉलिसी
जन्मतारखेचा पुराव्यासाठी (कोणतेही दोन)
शाळा सोडल्याचा दाखला,
जन्माचा दाखला,
दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट,
पासपोर्ट,
पॅन कार्ड
पत्त्याच्या आणि वयाच्या पुराव्यासाठी दिलेल्या कागदपत्रांपैकी प्रत्येकी दोन पुरावे (कलर झेरॉक्स )सादर करणे आवश्यक आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी नागरिकांनीआपले पूर्ण नाव व पत्ता SMS द्वारे खालील संपर्क क्रमांकावरती पाठवून नाव नोंदणी करावी
प्रमोद किर्वे :- ९१७२७३२००९
हनुमंत खोमणे :-९८९००९२८८०
सदर शिबिर हा एक सामाजिक उपक्रम असल्याने शासकीय शुल्कामधे नागरिकांना ड्रायव्हिंग लायसेन्स मिळणार आहे, तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
----------