भोर ! तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतिपदी राजेंद्र बोडके

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतिपदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवडी ता.भोर चे आदर्श शिक्षक राजेंद्र शिवाजी बोडके यांची बिनविरोध निवड झाली.सभापतीपदी बोडके यांची निवड झाल्याने भोर तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
          शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या बुधवार दि-१९ बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी डी.एम.डोके यांनी जाहीर केले.यावेळी शिक्षक सुदाम ओंबळे,अनंता अंबवले ,भीमराव शिंदे ,शिक्षक नेते पोपट निगडे ,माजी शिक्षक संघटना अध्यक्ष महेंद्र सावंत ,माजी सभापती विकास खुटवड ,संदीप दानवले,हनुमंत चव्हाण,हनुमंत दुरकर,बापू जेधे,पंडित गोळे,राजू कारभळ,आनंद गोसावी,विजय थोपटे आदींसह शिक्षक उपस्थित होते.




To Top