पुरंदर ! ठेकेदाराने गुळुंचे गावची पाणीपुरवठा पाइपलाईन उखडली : अन मदतीसाठी दगडूशेठ गणपती धावला

Pune Reporter
सोमेश्वर रिपोर्टर टिम- - - 
पुरंदर दि १३

पुरंदर तालुक्यातील गुळुंचे हे गाव मागील काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याला ताणलेले  आहे कारण रस्ता रुंदीकरण नीरा मोरगाव रस्त्यांचे मागील काही दिवसांपासून रुंदीकरण काम चालू असून या रुंदीकरणाच्या खुदाई कामामध्ये गुळुंचे गावची पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन  तोडली असून ती दुरूस्ती कुणी करायची आणि आर्थिक ताण कोण सोसणार   यावरून ठेकेदार व ग्रामपंचायत यामध्ये वाद चालला असून त्या वादने स्थानिक ग्रामस्थांच्या  घशाला कोरड पडूली आहे नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी बेहाल झाले आहेत .

पाच हजार लोकसंख्या असलेली गावची ही अवस्था दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या लक्षात आल्यानंतर ट्रस्टचे   सरचिटणीस माणिकराव  चव्हाण  ,बी एम गायकवाड खजिनदार यांनी क्षणाचा ही विलंब न लावता त्यांनी 2 टँकर गुळुंचे गावी पाठवून दिले .सद्यस्थितीला तरी गावची तहान भागली असुन सर्वांनी ट्रस्टचे आभार मानले आहेत .
To Top