राजधानीत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

Pune Reporter

नवी दिल्ली २५ जानेवारी 

महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज 12 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र सदनातील सभागृहात निवासी आयुक्त डॉ. निरूपमा डांगे यांनी राष्ट्रीय मतदार दिवसा‍निमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना लोकशाही परंपरांचे जतन आणि निवडणूकांचे पावित्र्य राखण्याची शपथ दिली.

याप्रसंगी राजशिष्टाचार व गुंतवणुक आयुक्त निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापक भागवंती मेश्राम यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र परिचय केंद्रात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

12 वा राष्ट्रीय मतदार दिवस महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ दिली.

0000

To Top