सोमेश्वर रिपोर्टर टीम----- --
पुणे येथील ट्रिनिटी कॅालेज ॲाफ इंजीनियरींग येथे "वन व्हील स्केटिंग अकादमी" तर्फे आयोजित स्केटिंग स्पर्धेत "पहिली खुली रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप" मध्ये बारामती स्केटिंग क्लबच्या रेवा प्रशांत बोकन हिने ६ वर्षांखालील वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला. लॅांग रेस तसेच शॅार्ट रेस या दोन्ही स्पर्धेत तिला प्रथम क्रमांक मिळाला.प्रशिक्षक प्रणाली पवार आणि वैष्णवी मचाले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ वन व्हील स्केटिंग अकादमी व इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडला.अभिनंदन रेवा बारामतीचे नाव तु ईतक्या लहान वयात जिल्हा पातळींवर क्रिडा क्षेत्रात झळकवले.सिद्धिविनायक फौडेशन बारामती, बारामती सहकारी बॅकेचे अध्यक्ष सचीन सातव व कसबा पेठ क्रिकेट क्लब च्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले.