पंतप्रधान मोदींनी केला शरद पवारांना फोन, तब्येतीची केली विचारपूस

Pune Reporter
विशेष प्रतिनिधी  
नवी दिल्ली  दि २५ जानेवारी 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: शरद पवार यांनी ट्विट करत ही माहिती दिली. प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान पवार यांना कोरोना झाल्याचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना तातडीने फोन करून पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

शरद पवार यांनी ट्विट ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी मला फोन करून माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. माझ्या प्रकृतीची विचारपूस केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे शरद पवार यांनी ट्विट केले.
To Top