सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी उत्रौली ता ल.भोर येथील वैष्णवी महिला बचत गटातील महिलांनी महाराष्ट्र शासन अंगीकृत महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत दीपस्तंभ लोक संचालित साधन केंद्र भोरच्या जिल्हा समन्वय अधिकारी अर्चना क्षीरसागर व दीपस्तंभच्या अध्यक्ष चंदन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२१ अतंरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचे औचित्य साधून पोस्ट कार्ड भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवून विनंती करण्यात आली आहे. भोर तालुक्यातील उत्रौली, कोर्ले, वेळू , नाझरे, शिंदेवाडी, वडतुंबी, अंबवडे, पारवडी, विरवाडी, कापूरहोळ दिवळे अश्या ३८ गावच्या महिला बचत गटाच्या २ हजार ७५० महिलांनी पोस्ट कार्ड पाठवून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करुन द्यावा अशी विनंती करण्यात आल्याची माहिती लेखापाल शुभांगी शिंदे यांनी दिली.याप्रसंगी वैष्णवी महिला बचत गट अध्यक्ष वैशाली शिंदे, उपाध्यक्ष सारिका साळुंखे सचिव तमन्ना मनेर,अलका शिंदे, शिला शिंदे, रेश्मा कुंभार, सुवर्णा कुंभार, ताराबाई कुंभार, रोहिणी दुर्गाडे, ज्योती शिंदे, प्रियांका कुंभार, किशोरी कुंभार, धनश्री कुंभार, निंदना कुंभार उपस्थित होत्या.