वाई ! एमआयडीसी येथे गरवारे वाॅलरुप्स कंपनीत मशीन मध्ये अडकून ३५ वर्षीय महिला कामगाराच्या मृत्यूने खळबळ

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी  
वाईच्या एमआयडीसी मधील गरवारे वालरुप्स
कंपनीच्या नेट प्रोसेस विभागात सौ.छाया संतोष बोधे वय ३५ वर्ष राहणार रविवार पेठ  वाई यांचा मशीनच्या दोरी मध्ये पाय अडकल्याने त्या मशीनला वेग असल्याने  दोरी सोबत त्या जमीनी पासून २० फुट ऊंचीवर असलेल्या मशीन मध्ये क्षणार्धात ओढल्या गेल्याने त्यांचा मशीन मध्ये अडकून जागीच मृत्यू झाल्याने कामगारांन मध्ये  खळबळ ऊडाली आहे .
हा अपघात आज मंगळवार दि.१५ रोजी सकाळी ७ |४० वाजण्याच्या सुमारास घडला आहे .या अपघाताची माहिती वाईचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना समजताच त्यांनी तातडीने अपघात  स्थळावर जाऊन परिस्थितीची पाहणी करुन तपासाच्या  सुचना दिल्या .मृत महिलेचा पतीही याच कंपनीत कामाला आहे .या झालेल्या भिषण अपघाता मुळे गरवारे कंपनीतील कामगारांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .
To Top