भोर ! शहरात दुकानदारांना प्लास्टिक कॅरीबॅग पुरवणाऱ्या दोघांवर कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर नगरपालिका प्रशासनाने आठवडे बाजारादिवशी शहरात विविध ठिकाणी छापे मारून दोन प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई करून ३०० किलो प्लास्टिकसह इको गाडी जप्त करण्यात आली.
            भोर शहरात प्लास्टिक विक्रीवर बंदी असतानाही विक्री होत असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनास मिळताच विविध ठिकाणी तपासणी केली असता नगरपरिषद अधिकाऱ्यांस कारवाई अंतर्गत प्रतिबंधित प्लास्टिक वस्तूंच्या विक्री व वाहतूक करताना इको गाडी व ३०० किलो प्लास्टिक मिळून आले.संबंधित प्लास्टिक विक्रेत्यांवर आरोग्य विभाग प्रमुख महेंद्र बांदल,नगर अभियंता अभिजित सोनवले रत्नदीप पालखे ,दिलीप भारंबे यांनी मंगळवार दि-१५ प्लास्टिक विक्रेता संजय लंबाते व त्याचा साथीदार यांच्यावर कारवाई करून भोर पोलिसात तक्रार दाखल केली.

To Top