वाई पोलिसांचा थरारक पाठलाग ! चोरी गेलेल्या स्कार्पिओसह दोन आरोपींच्या २४ तासात आवळल्या मुसक्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई :  प्रतिनिधी 
 खानापुर ता.वाई येथून अज्ञात चोरट्यांनी घरासमोर ऊभी असलेली ७ लाख रुपये किमतीची पांढर्या रंगाची   स्कार्पिओ गाडी भर दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास दि.१५ रोजी  चोरुन नेहल्याची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दाखल झाली याची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना समजताच त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ डिबीच्या पथकाला बोलावून गाडीचा 
तपास गतीने सुरु करण्याचे आदेश दिले .या पथकाने तपासा साठी खानापुर गावा पासून सीसीटिव्ही चेक करत तपास गतीमान करत हे पथक गाडीचा पाठलाग करत थेट मनमाड 
पर्यंत पोहचुन दोन आरोपीसह स्कॉर्पिओ गाडी ताब्यात घेतल्याने वाई तालुक्यातील जनतेने बाळासाहेब भरणे यांच्यासह डिबी पथकाचे कौतुक केले आहे .
          सविस्तर वृत्त असे कि खानापुर ता.वाई येथील रहिवासी असलेले सुनील मोहन चव्हाण यांनी दि.१५ च्या सकाळ पासुनच एम.एच.१४ ए.ई.१७०३ या क्रमांकाची पांढर्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी स्वताच्या घरासमोर ऊभी केली होती पण भरदिवसा दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ती गाडी लंपास केली याची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दाखल होताच बाळासाहेब भरणे यांनी  त्याची गंभीर दखल घेऊन तात्काळ डिबी विभागाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय शिर्के महिला पोलिस नाईक सोनाली माने किरण निंबाळकर श्रावण राठोड अमीत गोळे प्रसाद दुदुस्कर यांना बोलावून त्यांचे पथक तयार करुन मला चोरीस  गेलेली स्कॉर्पिओ हवी आहे एवढेच आदेश दिल्याने वरील पथक हातातील कामे सोडून तात्काळ तपासासाठी बाहेर पडले आणी खानापुर गावा पासून सीसीटिव्ही चेक करत असतानाच बाळासाहेब भरणे यांना गाडीने सातारा पुणे महामार्गावरील खेडशिवापुर टोलनाका पास केल्याची माहिती खबर्या मार्फत मिळताच भरणे यांनी तात्काळ हि माहिती डिबी पथकाला दिली .
त्याच बरोबर भरणे यांनी पुण्याच्या दिशेने स्कार्पिओ गेल्याने पुणे ग्रामीण पिंपरी चिंचवड अहमदनगर  नाशिक मनमाड  येथील एलसीबीच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाला देऊन तातडीने आप आपल्या हद्दीत नाका बंदी करुन गाडी ताब्यात घेण्याची विनंती केली होती तरी  देखील वाईचे  डिबी पथक रात्रीचा दिवस करत गाडीचा पाठलाग करत होते भरणे यांनी बाहेरील जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना या चोरट्यांची माहिती दिल्याने अखेर त्याचा फायदा होऊन मनमाडच्या पोलिस अधिकारी वर्गांने हि गाडी पकडली तो पर्यंत वाईचे डिबी पथक मनमाड पोलिस ठाण्यात पोहचुन दोन आरोपी सह स्कार्पिओ गाडी ताब्यात घेऊन हे अथक परिश्रम घेणारे वाईचे डिबी पथक वाईत पोहचले आणी गाडी चोरणारे कमलेश साखरलाल महाजन वय २३ वर्ष राहणार पारवा जि.ता.जळगाव आणी दत्तात्रय साहेबराव पवार वय २७ वर्ष राहणार कोष्टीगल्ली पारोळा ता.जि.जळगाव या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे .
To Top