भोरचं विसगाव खोरं ! विकास हाच ध्यास : रणजित शिवतरे विसगाव खोऱ्यात विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन संपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
 पुणे जिल्हा परिषद तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेले अनेक वर्षांपासून विसगाव खोऱ्याचा विकास होत आलेला आहे. पुढील काळात विसगाव खोऱ्याच्या विकासाचा ध्यास मनी ठेवून उर्वरित विकास कामांसाठी भरीव निधी दिला जाईल असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी २ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या उदघाटन व भूमिपूजन प्रसंगी  पाले,वरवडी खुर्द,वरवडी डायमुख येथे मंगळवार दि-२३ केले.                                                                     शिवतरे यांनी पाले व शिंदेवाडी रस्ता काॅंक्रटीकरण,शाळा वर्ग खोल्या,बंधारा, बंदिस्त गटर,गणपती मंदिर सभामंडप ,वरवडी डायमुख येथे अंगणवाडी याचे उद्घाटन व जलजीवन अंतर्गत नळपाणीपुरवठा योजना,खंडोबा मंदिर सभामंडप,शाळा संरक्षण भिंत,बंधारा दुरुस्ती,लक्ष्मी मंदिर सभामंडप,अंगणवाडी इमारत,स्मशानभूमी,दलीत वस्ती सभामंडप तर वरवडी खुर्द येथील धनावडे वाडी रस्ता, दत्त मंदिर सभामंडप, अंगणवाडी, वर्ग खोल्या यांचे उदघाटन व भूमीपूजन केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष घोरपड़े, सभापती लहूनाना शेलार, चंद्रकांत बाठे, संदिप नांगरे, मनोज खोपडे, विलास वरे, सुहीत जाधव, सरपंच बायडाबाई पाटणे, रघुनाथ भोसले, जितेंद्र लेकावळे,महेश शिवतरे,बाळासाहेब खुटवड,सचिन पाटणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

To Top