वाई प्रतिनिधी दि.१९
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या वाई शहरातील काशिविश्वेर मंदिरातील आडात ७ कट्यार आणी १ खंजीर ऐन शिव जयंती दिवशी सापडल्याची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना समजताच त्यांनी डिबीचे किरण निंबाळकर श्रावण राठोड या सहकार्यांना सोबत घेऊन त्या आडाला भेट देऊन सापडलेली हत्यारे ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात जमा केली आहेत .
घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी की
दक्षिण काशी समजल्या जाणार्या आणी वाईचे
आराध्य दैवत असलेल्या महा गणपती मंदीराच्या परिसरात काशीविश्वेसराचे मंदिर आहे या ठिकाणी मोठा आड असुन त्याला भरपुर पाणी आहे पण याची बरेच वर्षा पासून देखभाल न केल्याने असणार्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने त्याचे मालक असलेले शैलेद्र गोखले यांनी आवडतील स्वच्छता आणी
गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते गाळ
काढण्याचे काम सुरु असतानाच त्या मध्ये ७ कट्यार आणी १ खंजीर गंजलेल्या अवस्थेत सापडले .
गोखले यांनी या बाबतची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकबाळासाहेब भरणे यांना तातडीने दिली तेही तातडीने आडावर पोलिस सहकार्याना घेऊन पोहचले .सापडलेल्या हत्यारांचा रितसर पंचनामा करुन ताब्यात घेऊन याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल आणी वाईच्या डिवायएसपी शितल खराडे जानवे वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांना दिली. हे ७ कट्यार आणी १ खंजीर अशी ८ हत्यारे हि पुणे येथील पुरातत्व विभागा कडे सोपवुन ति कुठल्या काळातील आहेत याचा शोध घेतला जाणार आहे अशी माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकबाळासाहेब भरणे यांनी दिली आहे ..