सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जावली : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून तसेच युनायटेड स्पोर्ट्स अँड एडवेंचर मुंबई यांच्या सहकार्याने दरे तर्फ तांब ता. महाबळेश्वर या ठिकाणी श्रीकांत शिंदे रन महाबळेश्वर एडुराथॉन २०२२ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.सह्याद्रीच्या डोंगर कपारीतून पळताना स्पर्धकांना वेगळीच अनुभूती आल्याचे स्पर्धक सांगत होते.या स्पर्धेत कर्नाटक, बेळगाव, मध्यप्रदेश, गोवा, राजस्थान, गुजरात, सातारा, सांगली, कोल्हापूर ,सोलापूर, साऊथ आफ्रिका येथून स्पर्धक सहभागी झाल्याची माहिती युनायटेड स्पोर्ट्स अँड ऍडव्हेंचर मुंबईचे अध्यक्ष विकास मोरे यांनी दिली.
यामध्ये ७५ किमी देव चौधरी,वीरेंद्र कौंनजिया,विश्वनाथ शेटे यांनी क्रमांक पटकावले तर १०० किमी मध्ये सुरत येथील नोबी हे एकमेक स्पर्धक विजयी झाले.५० किमी बाबू चौंगाला,सुनील साळुंखे,अरुण नायक,यांनी क्रमांक पटकावले,५ किमी किशोर संकपाळ,स्वाती संकपाळ,मनोज आंग्रे,१० किमी सुहास आंबरळे,डॉ.इंदू टंडन,राहुल भोसले २१ किमी स्वप्नील सावंत,टी भोयर,मनोज राणे यांनी अनुक्रमे पहिला,दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. दोन दिवसांनंतर या स्पर्धेचा बक्षीस वितरण सामोरंभ मंत्री एकनाथजी शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे व नगरसेवक प्रकाश शिंदे यांचे हस्ते दरे तर्फ तांब गावी पार पडला यावेळी शाखाप्रमुख महेश शिंदे ,विजय शिंदे,संजय मोरे,अजित सपकाळ,सचिन कदम व अन्य मान्यवर उपस्थित होते.