भोर ! पोस्ट खात्यात नोकरी लावन्याचे आमिष दाखवून ८५ युवकांचे १९ लाख घेऊन फसवणूक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यातील ८५ युवकांना पोस्ट खात्यात नोकरीस लावलो असे अमिष दाखवुन १९ लाख ७० हजार रूपये घेवुन त्यांची केली फसवणुक केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर शिवाजी वरे रा.वरवडी ता.भोर याच्या भोर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
        भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च २०२० ते डिसेंबर २०२१ रोजीचे दरम्यान निलेश तानाजी तावरे वय २७, रा. चिखलगाव, ता. भोर यास व त्याचे नातेवाईक यांना ज्ञानेश्वर शिवाजी वरे रा.वरवडी ता.भोर याने पोस्ट खात्यात नोकरी लावतो असे सांगुन त्याचेकडुन २ लाख घेतले होते.तावरे यास पोस्ट खात्यात नोकरी लागली आहे असे सांगून वरे याने तावरेच्या नातेवाईकांचा विश्वास संपादन केला. तसेच तावरेच्या मित्रांना निलेश तानाजी तावरे याचे बँक अकाऊंटला लाखो रूपये टाकण्यास सागुन एकुण १९ लाख ७० हजार रुपये ऑनलाईल व रोख रक्कम ज्ञानेश्वर वरे याने घेवुन कोनालाही नोकरी न लावता त्यांची फसवणुक केली असलेबाबत निलेश तानाजी तावरे रा. चिखलगाव, ता. भोर  याने भोर पोलिसात तक्रार दिली. याप्रमाणे वरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करीत आहेत.

To Top