सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आरोग्य उपकेंद्र निंबुत ता बारामती येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ आरोग्य व बांधकाम सभापती जिल्हा परिषद पुणे प्रमोद काकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी बारामती पंचायत समिती सभापती निता फरांदे तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे व प्राथमिक आरोग्य केंद्र होळ चे वैद्यकीय अधिकारी डॉ ज्ञानदीप राजगे उपस्थित होते प्रा आ केंद्र होळ कार्यक्षेत्रात डॉ मनोज खोमणे तालुका आरोग्य अधिकारी बारामती व डॉ ज्ञानदीप राजगे डॉ प्रज्ञा खोमणे डॉ कर्णवीर शिंदे प्रा आ केंद्र होळ वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज ५ हजार ४९७ बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आले यासाठी ४३ पोलिओ बूथ उभारण्यात आले होते व दोन मोबाईल टीम करण्यात आल्या होत्या. तसेच दि २६ रोजी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येऊन १३८ बालकांना लसीकरण करण्यात आले यासाठी प्रा आ केंद्र होळ मधील सर्व आरोग्य कर्मचारी तसेच अंगणवाडी व आशा कार्यकर्ती असे सर्व मिळून १०३ कर्मचारी यांनी परिश्रम घेतले
COMMENTS