सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर शहर तसेच ग्रामीण भागात अनेक बेघर,वेडसर तसेच फिरीस्ती लोक आहेत.यांचा थंडीपासून बचाव होण्यासाठी ध्रुव प्रतिष्ठान टीटेघर ता.भोरचे अध्यक्ष राजू केळकर यांनी एक ऊबीचा आहात म्हणून २४ ब्लँकेट वाटप केले.
ध्रुव प्रतिष्ठान वर्षभर अनेक नवनवीन सामाजिक उपक्रम राबवित असते.शहरातील व ग्रामीण भागातील २४ बेघर फिरस्त्यांना ब्लॅंकेट वाटप केल्याने केळकर यांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.यावेळी पिंटू चिकने, राहुल खोपडे,बाळू देशमाने उपस्थित होते.