सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : प्रतिनिधी
नीरा व पिंपरे (खुर्द) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका व पिंपरे (खुर्द) माहेर असलेल्या आदर्श शिक्षिका संध्या गायकवाड - ढमाळ यांची नुक्तीच पुणे जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी पदी पदोन्नती झाली.
संध्या ढमाळ या पुर्वीही नीरा ता.पुरंदर येथील प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी इयत्तेत ज्ञानदानाचे काम केले. त्यावेळी त्या नीरा प्रभाग दोन मध्ये रहिवाशी होत्या. ढमाळ यांची उपशिक्षणाधिकारी पदि पदोन्नती झाल्यानंतर नीरेती झनकार व्याख्यानमालेत त्यांना लोकनायक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
संध्या गायकवाड - ढमाळ यांची पुणे जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी पदी निवड झालेल्या बद्दल नीरा व परिसरातील शिक्षण प्रेमींनकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, माजी बांधकाम सभापती दत्ताजीराव चव्हाण, शिक्षक नेते नाना जोशी, झकांर व्याख्यान मालेचे संयोजक जेष्ठ साहित्यिक व. बा. बोधे, बाबुशेट शहा, बाळासाहेब भोसले, सतिश शिंदे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.