परवा पत्र आज सर्व्हे.... हे फक्तं घडतं उपमुख्यमंत्री अजितदादांच्या दरबारात.....! काय आहे वाचा सविस्तर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे मोरगाव चौफुला पुणे  PMPML बस मार्गाचे आज तातडीने सर्वेक्षण करण्यात आले. 
      उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने सुपे हडपसर पुणे बस सेवा लवकरच सुरु करण्यात येणार असून आज PMPML कडुन मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले.        सदर मार्गांवर बसचे फेऱ्या सुरु झाल्यास विद्यार्थी व्यापारी व प्रवासी यांना फायदा होईल. गेल्या पाच महिन्या पासून ग्रामपंचायत सुपे कडुन वेळोवेळी पाठपुरावा केला गेला परवा दिनांक 9/2/2022रोजी ग्रामपंचायत सुपे तसेच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गणेश चांदगुडे या दोघांची पाठपुराव्याची पत्रे मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून देण्यात आली होती त्यावेळी लगेचच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संबंधित विभागाला तातडीने लक्ष घालण्याचे आदेश दिले होते आणी आज लगेचच उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाची अंमलबजावणी झाली आज PMPML मुख्यअधिकारी मा लक्ष्मीनारायण मिश्रा ,  दत्तात्रय झेंडे सरव्यवस्थापक संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली आज पीएमपीएमएल कर्मचारी गुलाबराव शिंदे , दत्तात्रय बडदे वाहतुक शाखा ,अनिल हिरवे उपाध्यक्ष रा यु कॉ बारामती तालुका ,बाळासो सुपेकर आदी मान्यवर यांनी पाहणी केली. 
हडपसर  ,चौफुला ते सुपे 63 km अंतर असुन हडपसर ते मोरगाव सुपे असे दोन विभाग होतील , याठिकाणची विद्यार्थी व वाहतुक पाहता लवकरच ही सेवा सुरू होईल अशी माहिती देण्यात आली यासाठी सूपे ग्रामपंचायत सरपंच स्वातीताई हिरवे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गणेश चांदगुडे, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शौकतभाई कोतवाल,बाबूर्डी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे,सुपे गावचे माजी उपसरपंच शफीक बागवान यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला
To Top