बारामती दि १८
महाराष्ट्र राज्य विधान परीषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे आज अष्टविनायक यात्रेची सांगता निमित्ताने मोरगांव येथे आल्या होत्या.राज्यातील जनता कोरोनामुक्त व्हावी व शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येण्यासाठी उपसभापतींनी मयुरेश्वर चरणी प्रार्थना केली .
आज उपसभापती निलमताई गोऱ्हे मयुरेश्वर दर्शनासाठी मोरगांव येथे आल्या होत्या . त्यांसमवेत सुनीता मोरे जिल्हा प्रमुख महीला आघाडी सांगली , विजया शिंदे महीला आघाडी सह संपर्क प्रमुख व निवडक कार्यकर्ते होते .श्रींचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अभीषेक पुजा , आरती केली . यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने विश्वस्त विनोद पवार , तर मोरगाव ग्रामपंचायतच्यावतीने सरपंच निलेश केदारी , माजी सरपंच पोपट तावरे यांनी त्यांचा सत्कार श्रींचा फोटो , शाल , श्रीफळ देऊन केला . यानंतर झालेल्या बैठकीमध्ये उपस्थितांशी बोलताना त्यांनी सांगीतले की , तिर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत भक्तनिवास , रस्ते , अन्नसत्र हॉल व इतर मूलभूत सोइ सुविधासाठी आवश्यकतो निधी मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु असून अष्टविनायक तीर्थक्षेत्री लवकरच कायापालट झालेले असेल . यामुळे भावीक व पर्यटकांना अधीकाधीक उत्कृष्ट सेवा मिळण्यास मदत होइल .
अष्टविनायक यात्रा करण्यामागचा उद्देशाबाबत उपसभापतींनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , व महानिकास आघाडी जनतेचे अधीकाधीक प्रश्न सोडवण्याचा जो प्रयत्न करतात त्याला यश मिळावे . तसेच शेतकऱ्यांचे शेतमाल , आत्महत्या यांसारखे प्रश्न सुटून बळीराजाला सुखाचे दिवस यावेत यासाठी देवाकडे प्रार्थना केली असल्याचे सांगितले.
COMMENTS