सोमेश्वर रिपोर्टर टीम - - -
पुरंदर दि २३
बारामती तालुक्यातील मुर्टी ते पुरंदर तालुक्यातील नीरा दरम्यान सातारा अहमदनगर रोडवर धावत्या टेम्पो मधून सात फ्रिजची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत टेम्पोचालकाने नीरा पोलीस दुर्क्षेत्रत फिर्याद दिली आहे. यांदर्भात पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात भारतीय दंड विधान कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
मंगळवार दि. २२ रोजी रामेश्वर सदाशिव आडसुळ रा.लातूर यांनी नीरा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानीं दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या मालकीच्या आयशर टेम्पो मधुन रांजणगाव एमआयडीसी येथून व्हरपुल कंपनीचे फ्रिज घेऊन ते कोल्हापूर व हातकलंगले या ठिकाणी चालले होते. दि.२० फेब्रुवारी रोजी रात्री मुर्टी येथील जयमल्हार ढाबा येथे ते चहा पिले. त्यावेळी गाडी मध्ये सर्व फ्रिज होते. सातारा जिल्ह्यातील वाठर स्टेशन येथे गेल्यावर साई ढाबा येथे जेवणासाठी त्यानीं टेम्पो उभा केला असता, त्यांना टेम्पोत सात फ्रिज नसल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी नीरा येथील सीसीटिव्ही पुटेज तपासले असता त्यांना टेम्पोत सात फ्रिज कमी असल्याचे आढळून आले. म्हणजेच मुर्टी ते नीरा या दरम्यान हे फ्रिज चोरीला गेले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबतचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर व नीरा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उप निरीक्षक कैलास गोतपागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक हरिश्चंद्र करे करीत आहेत.