सोमेश्वर विद्यालय भाग शाळा करंजे येथे 'मातृ-पितृ' दिन उत्साहात संपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
आई आणि वडील जगातील अश्या व्यक्ती आहेत ज्यांचं प्रेम बाकी व्यक्तींसारखे बदलत नाही, त्यांच प्रेम तसंच राहतं... तुम्ही वयाने लहान असाल किंवा मोठे त्यांच प्रेम तुमच्यासाठी तसंच राहतं.
 आपल्याला त्यांच प्रेम शब्दात व्यक्त करणं कठीणच आहे. आपल्या लेकरासाठी स्वतःचे प्राणही पणाला लावतील असे आईवडील असतात. त्यांच्या आशीर्वादात विश्वातील सर्वोच्च शक्ती असते.
काल सोमवार दि.१४ फेब्रुवारी रोजी 'मातृ-पितृ दिनाचे' औचित्य साधून त्यांच्या प्रेमाचा आदर म्हणून व त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सोमेश्वर विद्यालय, करंजे येथे विद्यार्थ्यांनी आपल्या मातापित्यांचे पुजन केले. 
अवघं जग व्हॅलेंटाइन डे मिरवत असताना विद्यार्थ्यांनी आईवडिलांच्या प्रेमाचा व्हॅलेंटाइन साजरा केला.
       विद्यार्थ्यांनी आईवडीलांचे पाय धुवून त्यांचे औक्षण केले. त्यांना हार घालून त्यांच्या पायावर मस्तक ठेवले.
     यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गुलाबभाऊ गायकवाड, सोमेश्वर विद्यालयाचे प्राचार्य श्री.एस.पी. जगताप, विद्यार्थ्यांचे पालक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. 
     यावेळी पाचार्य श्री.एस.पी. जगताप, पालक श्री.सचिन पाटोळे यांची मनोगते झाली. शाळेचे सहशिक्षक श्री.डोंबाळे ए.सी. यांनी आपल्या मनोगतात गायलेल्या आईवडीलांवरील गीताने वातावरणात रंग भरले.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.माळशिकारे ए.बी. यांनी तर .कुचेकर एम.डी यांनी आभार मानले.
   

To Top