खळबळजनक ! वाई येथील हरिहरेश्वर बॅंकेत तपासा दरम्यान साडेचार कोटीचा घोटाळा पुन्हा उघड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
वाई : प्रतिनिधी 
वाई शहरातील नामांकित 2  पतसंस्था आणी १ बॅंक या तिन्ही बॅंकांना २०१९ ते २०२१ अखेर हरिहरेश्वर बॅंकेने दिलेल्या ठेव तारण कर्ज प्रकरणाची छाननी केली असता २ हजार १५|१६ आणी १६|१७ व १८| १९ या कालावधी
मध्ये प्रत्येकक्षात बनावट कर्ज खात्यावर रकमेचा भरणा न करता आरोपी व मुख्य सूत्रधार असणारा नंदकुमार खामकर व मयत असलेला संचालक वजीर शेख यांचे बोगस कर्ज खात्यावर बोगस रक्कम भरणा केल्याचे दाखवुन एकुण ४ कोटी ४९ लाख ५२ हजार ४३० एवढ्या रकमेचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे .त्याच बरोबर वाई
 यांनी हरिहरेश्वर बॅंकेत ठेवलेल्या व परत काढुन घेतलेल्या गुंतवणूकीवर बोगस  ठेव तारण कर्ज निर्माण करुन एकुण ४ कोटी ४९ लाख ५२ हजार ४३० 
रुपयांचा अपहार करुन बॅंकेच्या संचालकांन 
सह व्यवस्थापक आणी अधिकारी यांनी   ठेवीदारा आणी सभासदांची फसवणूक व विश्वास घात करुन करोडो रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी सि.ए.विष्णे बाळासाहेब साळुंखे वय ३८ राहणार कुशी पोस्ट नागेवाडी ता.जिल्हा सातारा यांनी वाई पोलिस ठाण्यात 
सोमवार दि.२१ रोजी तक्रार दाखल केल्याने वाई शहरात एकच खळबळ उडाली आहे .याचा अधिक तपास वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे हे 
करीत आहेत .सातारा येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकार्यांनी खोलवर तपास करुन आज अखेर ४२ कोटींचा झालेला अपहार उघडकीस आणल्याने त्यांचे वाई शहरा
सह तालुक्यातील ठेवीदार आणी सभासदांनी 
कौतुक केले आहे . 
 
वाई शहरातील नामांकित हरिहरेश्वर बॅंकेत संस्थापक नंदकुमार खामकर व त्यांच्या सहकार्यांनी एकत्रीत येऊन दिवसभर काबाड कष्ट करणार्या असंख्य गोरगरीबांच्या नावावर 
बोगस कर्ज प्रकरणे करुन त्यांची फसवणूक 
करुन तब्बल ३७ कोटी ४६ लाख ८९ हजार ३४४ रुपयांचा घोटाळा झाल्याचे सातारा  आर्थिक गुन्हे शाखा   पोलिसांनी तपासात उघडकीस आणल्याने व या घोटाळ्यास जबाबदार असणार्यांना गजाआड केल्याने वाई तालुक्यात खळबळ ऊडाली होती ..
To Top