सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जावली : धनंजय गोरे
जावली तालुक्यातील एकमेव असणाऱ्या प्रतापगड कारखान्याच्या निवडणुकीच्या संस्थापक पैनलची सांगता प्रचार सभा कुडाळ ता. जावली येथे सर्व सभासद व माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे,चेयरमैन सुनेत्राताई शिंदे,व्हाइस चेयरमैन राजेंद्र फरांदे,माजी उपसभापती हणमंत पार्टे यांच्या उपस्थिति मधे संपन्न झाली.
सांगता सभेत बोलताना संस्थापक पैनल चे प्रमुख व जावली पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे म्हणाले,तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी कारखान्याची निर्मिति माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांनी केली, असून अडचणी मधे असलेल्या कारखाना पुन्हा सुरु करण्याचे कोणतेच धेय्य धोरण विरोधी कारखाना बचाव पैनल कड़े नसून,फक्त राजकारण करून सहकार बुडविन्याचे काम विरोधक करीत आहेत आपण सर्वानी तालुक्यात असणाऱ्या सहकारी संस्था टिकवून ठेवल्या पाहिजेत, प्रतापगड कारखाना सोमय्या सोबत 5 वर्ष सोमेश्वर सोबत 2 वर्ष तर किसनवीर सोबत 16 वर्षा साठी करार असून किसनवीर ने 3 वर्ष कारखाना नाही चालवाला त्यात आमचा दोष नसून किसनवीर ने 25 कोटि मधे आम्हाला प्रतापगड त्याब्यात द्यावा की मागणी केली असून कारखाना सुरु करण्यासाठी आमच्या कड़े प्लान तयार आहे,स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी उपपदार्थ निर्मिति करावी लागणार असून तरच ऊस दर देवू शकतो.
बचाव पैनल च्या दिपक पवार आणि कुटुंबायांनी कोणती सहकारी संस्था टिकविली राजेश्वरी बँक, मेरुलिंग पतसंस्था आता संपल्या आहेत,त्यांचे सभासद ठेविदार कुठे आहेत,स्वतःची संस्था न टिकविनारे दुसऱ्यांची संस्था काय टिकविनार आहेत,माझे कामगारानीच ही निवडणूक हाती घेतली असून कामगारांच्या हिताचे निर्णय वेळो वेळी संचालक मंडळाने घेतले आहेत येणाऱ्या काळात सभासद व कामगारच बचाव पैनल ला कायमचा धड़ा शिकवितील काकांच्या व भैय्यांच्या विचारांवर मि काम करीत असून भविष्यात शरद पवारांच्या हस्ते गाळप सुरु करूयात व ऊस उत्पादक व कामगारांच्या हिताचे निर्णय घेवून प्रतापगड निश्चित नावरूपाला आणन्याच्या विश्वास सौरभ शिंदे यांनी व्यक्त केला
माजी आमदार सदाशिव सपकाळ म्हणाले, लालसिंगराव काकांच्या सोबत कारखाना उभारणी करीता शासन दरबारी प्रयत्न करीत असताना महू हातगेघर धरण प्रस्ताव केला येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या उसाला भाव व कामगारांच्या हाताला काम हे धेय्य ठेवून काम करुयात 90% सभासद सौरभ शिंदे च्या पाठीशी असून त्यांचा विजय ठरलेला आहे,
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी दिपक पवार यांच्या वर् टिका करताना ज्यांना संस्था चालविता येत नाहीत ते बाजीरावाची ऐट दाखवित कारखाना चालविण्यास निघाले आहेत,लोक मदन भोसले याना देव माणूस म्हणत होती त्यानी मात्र किसनवीर कारखाना देशो धड़ीला लावला त्याना देखील प्रतापगड नीट चालविता आला नाही दिपक पवारांच्या भुल थापाना बळी न पड़ता मतदान करुण संस्थापक पैनल ला विजयी करण्याचे आवाहन वसंतराव मानकुमरे यांनी केले.