बारामती ! पवार कुटुंबीयांची सोशल मिडीयावरती बदनामी : माळेगाव येथे एकावर गुन्हा दाखल

Pune Reporter

बारामती 
   व्हाॅटसअॅपवर पवार कुटुंबाविषयी बदनामी कारक मजकूर प्रसिद्ध करणा-या माळेगाव ता.बारामती येथिल शैलेश दंडवते याचेवर बारामती तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  याबाबत पुष्कराज विठ्ठल  निंबाळकर (रा.शिवनगर  माळेगाव) यांनी फिर्याद दिली असून ते व्हाॅट्सअप वरील संदेश पहात असताना फिर्यादीचे मित्र निखिल माने यांनी एका मोबाईल नंबरचा स्क्रीन शॉट पाठवला.या संदेशात खा.शरद पवार,खा.सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विविध व्यवसायातुन हजारो कोटी रुपये मिळतात.वास्तविक सदर माहिती खोटी असुन पवार कुटुंबातील व्यक्तींची जाणिवपूर्वक बदनामी करण्यात येत आहे.
    सदर व्हाॅट्सअप संदेश शैलेश दंडवते रा.माळेगाव यांनी प्रसारित केल्याने त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
To Top