भोर ! भोरची पंचायत समिती होणार चकाचक : इमारत विस्तार व फर्निचरसाठी सव्वा कोटींचा निधी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
जिल्ह्यात भोर पंचायत समिती आदर्शवत असल्याने विद्यमान सभापती व उपसभापती यांना राज्याचा आदर्श पुरस्कार मिळाला आहे.याच भोर पंचायत समितीसाठी जिल्हा परिषद पुणेच्या माध्यमातून इमारत विस्तार व नवीन फर्निचरसाठी १ कोटी २७ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या हस्ते मंगळवार दि-१५ पार पडला.लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याचे शिवतरे यांनी सांगितले.
         यावेळी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे,सदस्य शलाका कोंडे,पंचायत समिती सभापती लहानाना शेलार,गटविकास अधिकारी विशाल तनपुरे,सदस्य पूनम पांगारे,माजी उपसभापती अमोल पांगारे,तालुका वैदयकीय अधिकारी सूर्यकांत कऱ्हाळे,उपअभियंता इकबाल शेख उपस्थित होते.
To Top