बारामती ! दोन वर्षातून घुमणार वाणेवाडीच्या 'पवनपुत्र'चा आवाज

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी (ता.बारामती) येथील हनुमान देवस्थान ट्रस्टच्या वतीने तीन दिवसीय पवनपुत्र व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे हे १४ वे वर्ष असून कोरोनामुळे दोन वर्ष व्याख्यानमाला होवू शकली नव्हती.       मंगळवार(दि.५) रोजी माजी आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील हे गावसेवा हीच ईश्वरसेवा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. बुधवार(दि.६) रोजी साहित्यिक व वक्ते डॉ. संजय कळमकर हे जगणे सुंदर व्हावे या विषयावर तर गुरुवार(दि.७) रोजी प्रसिध्द वात्रटिकाकार रामदास फुटाणे हे भारत कधी कधी माझा देश आहे या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. वाणेवाडी गावातील व्याख्यानमाला परीसरातील तरुणांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे. सायंकाळी साडेसहा वाजता हनुमान मंदीर प्रांगणात आयोजित केलेल्या व्याख्यानमालेला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 
To Top