सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
ग्रामीण अर्थव्यवस्था सबलीकरण व उभारणीत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महत्वपूर्ण काम केले असून, विकास सोसायट्यांट्या माध्यमातून जिल्हा सहकारी बँकेने शेतकऱ्यांना सक्षम बनिवले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सहकार विभागाचे संचालक अरुण प्रसाद यांनी केले.
ओझर्डे ( ता. वाई) येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व महात्मा गांधी विकास सेवा सोसायटीच्या कामकाजाच्या अभ्यासाकरिता केंद्रीय सहकार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी-यांनी पुणे येथील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था, पुणे यांचेमार्फत भेट दिली. यावेळी संस्था सक्षमीकरणासाठी केलेल्या उत्कृष्ठ कामकाजाची व सोसायटीने राबविलेल्या विविध उपक्रमाची प्रशंसा केली.
अरुण प्रसाद पुढे म्हणाले, सातारा जिल्हा बँकेचे कामकाज देशात आदर्शवत असून नव्याने स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयासाठी मार्गदर्शक ठरेल. विकास सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकरी सभासदांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न करीत बँकने जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका निभावल्याचे दिसून आले. महात्मा गांधी विकास सोसायटीने शेतकरी सभासदांसाठी विविध सेवा सुविधा सुरु केल्याचे पाहून सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास झाल्याचे पाहून या भेटीचा खूप आनंद व समाधान झाल्याचे सांगितले.
सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे म्हणाले, जिल्हा बँकेचे कामकाज रिझर्व्ह बँक व नाबार्ड यांचे नियम व निकष तंतोतंत पालन करुन होते. विकास संस्थाचे सक्षमीकरण, शेतकऱ्यांसाठी विविध कर्ज योजना व सामाजिक बांधिलकीच्या जोरावर बँकेस नाबार्ड, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील विविध पुरस्कारांनी गौरविले आहे.
नव्याने स्थापन झालेल्या सहकार खात्यासाठी धोरण ठरविताना जिल्हा बँकेच्या व विकास सोसायट्यांच्या कामकाजाच्या माहीतीचा नक्कीच फायदा होईल.
कार्यक्रमास वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था, पुणेच्या प्रकल्प संचालक जयालक्ष्मी, केंद्रातील सहकार मंत्रालयातील विविध विभागांचे अधिकारी, तंटामुक्तीचे अध्यक्ष विजयराव पिसाळ, अॅड. उदयसिंह पिसाळ, सोसायटीचे अध्यक्ष सुनिल कदम, माधवराव पिसाळ उपव्यवस्थापक भानुदास भंडारे, महेश शिंदे, विभागीय विकास अधिकारी संजय मांढरे, विक्री अधिकारी पुरुषोत्तम डेरे, विकास अधिकारी संजय जाधव, आण्णासाहेब फरांदे, रामदास इबत्ती, विक्रमसिंह पिसाळ, महेश पिसाळ, राजेंद्र निकम, जमील इनामदार, अरविंद गुरव, लालासाहेब पिसाळ, भगवान धुमाळ, दत्तात्रय शिंदे, सर्जेराव फरांदे, संदिप निकम, संदिप गायकवाड, राजेंद्र फरांदे, अतुल कदम सोसायटीचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.