बारामती ! तो 'त्या' विवाहीत महिलेचा लग्नासाठी करत होता जाच : जाचाला कंटाळून विवाहतेची आत्महत्या : वडगाव निंबाळकर पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मोराळवाडीत तरुणाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी तिघांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मोराळवाडी ता. बारामती येथे हा प्रकार घडला. विवाहितेने २८ मार्च रोजी विष प्राशन केल्यानंतर तिला पुण्यात ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तिथेच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आकाश मुरलीधर कारंडे, उज्ज्वला मुरलीधर कारंडे व मुरलीधर कुंडलिक कारंडे (रा. कारंडेमळा, मोराळवाडी, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आत्महत्या केलेल्या विवाहतेच्या वडिलांनी  पोलिसांत फिर्याद दिली आहे.
 फिर्यादीत म्‍हटलं आहे की , भावकीतील मुलगा आकाश कारंडे हा विवाहित मुलीची छेड काढत होता. ६ नोव्हेंबर २०१९ रोजी आकाशच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.   जून २०२० मध्ये  श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार गावातील तरुणासोबत मुलीचा विवाह केला हाेता. मागील सहा महिन्यांपूर्वी विवाहित मुलीच्या आईची आजारपणात देखभालीसाठी माहेरी आली होती. त्यानंतर पुन्हा ती सासरी गेली.
१५ मार्च रोजी विवाहितेच्या सासूने मुलगीच्या वडीलांना फोन करत तुमच्या मुलीला आठ दिवस माहेरी न्या, असा निरोप दिला. त्यानंतर वडीलांनी १६ मार्च रोजी तिला माहेरी आणले. दोन दिवसांनी जावयाने त्यांना मोबाईलवर विवाहित मुलगी आणि आकाश कारंडे या दोघांचे फोटो पाठवत यासंदर्भात  विचारणा केली.
वडीलांनी मुलीकडे विचारणा केली असता तिने, सहा महिन्यांपूर्वी आईच्या आजारपणावेळी मोराळवाडीत आली असताना आकाशने मोबाईल नंबर व सासरचा पत्ता दिला नाही तर मी तुझ्या भावाला मारून टाकीन, तुझ्या सासरच्या घरी येवून आत्महत्या करेन, अशी धमकी देवून जबरदस्तीने मोबाईल क्रमांक घेतल्याचे सांगितले.  विवाहित मुलीच्या आईला तिच्या वडिलांना २८ मार्च रोजी मोरगावला दवाखान्यात घेऊन गेले होते. दुपारी ते घरी आले असताना गोठ्यात मुलगी बेशुद्ध पडल्याचे निदर्शनास आले. कुटुबियांना तिच्या एका हातात किटक नाशकाची बाटली तर दुसऱ्या हातात एक चिठ्ठी आढळून आली. वडिलांनी तिला तातडीने मोरगाव तेथील ससून रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु, दि. ३० रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
To Top