सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी भोर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवार दि ९ रोजी भोर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांना निषेधाचे निवेदन देत तीव्र आंदोलन केले.
पवार यांच्या घरावर अशाप्रकारे दगड होणे ही अत्यंत निंदनीय कृत्य असून याचा तीव्र शब्दात निषेध करीत पोलिसांनी या दगडफेकीच्या मागचे कर्ते, करविते ,सूत्रधार जे कोणी असतील त्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे निवेदन भोर पोलीसांना देत कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले.यावेळी शरद पवार तुम आगे बढो ,देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो या व इतर घोषणा देत शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सामील होते.आंदोलन प्रसंगी तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे,माजी उपसभापती विक्रम खुटवड ,माजी सभापती लहूनाना शेलार,मानसिंग धुमाळ,माजी जी.प.सदस्य वंदना धुमाळ,शहराध्यक्ष नितीन धारने,हसीना शेख,विजय रावळ,रणधीर खोपडे,बी.डी. गायकवाड,पर्वतनाना कुमकर,सुहित जाधव,मंदार वीर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.