'सोमेश्वर'ची ३१ मार्च पर्यंतची साखर बुडाली आहे...! तर टेन्शन घेऊ नका : या तारखेअखेर मिळणार बुडालेली साखर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकरी साखर कारखान्याच्या नियमानुसार आर्थिक वर्षातील सभासदांना देण्यात येणारी साखर ३१ मार्चपूर्वी घेणून जाणे बंधनकारक असते अन्यथा ती साखर पुन्हा सभासदांना मिळणार नसती. मात्र यामध्ये कारखान्याने सभासदांना सवलत देत यामध्ये एक महिन्याची वाढ करण्यात आली आहे. ज्या सभासदाची साखर राहिली आहे त्यांनी ती ३० एप्रिल पर्यंत घेऊन जायची आहे. असे कारखान्याने काढलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे. 
            याबाबत कारखान्याने काढलेल्या परिपत्रकात म्हणटले आहे की, कारखान्याचे सर्व सभासद बंधू भगिनी यांना कळविणेत येते की, ज्या सभासद /शेअर मागणीदार यांची दि.३१/०३/२०२२ पुर्वीची साखर उचल करावयाची राहिलेली असेल त्यांचेबाबत विशेष बाब म्हणून सदर साखर उचल करणेसाठी दि. ३०/०४/२०२२ अखेर पर्यंत मुदतवाढ देणेत आलेली आहे. तरी या मुदतीत साखर नेहून कारखाना व्यवस्थानास सहकार्य करावे. व यापुढे साखर नेहणेस मुदतवाढ दिली जाणार नाही नसल्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी सांगितले आहे.
To Top