सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
मा.फुले जयंती निम्मित सुपे गावात भव्य मिरवणुक दिनांक ११ एप्रील २०२२ रोजी मा.फुले जयंतीचे औचित्य साधुन समता परिषद सुपे शाखा याच्यांवतीने सुपे गावात ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आले होते.
समता परिषद कार्यकर्तेनी मा.फुलेंच मुळ गाव खानवडी पुरंदर येथुन सुपे गावात समतेची ज्योत आणली. सुपे गावात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापाशी ज्योतीस पुष्पहार घालुन स्वागत करण्यांत आले. सांय ६ वा सुमारास भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आले होते. सदर जयंती निम्मित दिं ९ एप्रिल रोजी रक्तदान शिबीर आयोजीत केले होते.
माहात्मा फूले जयंती उत्सव समता परिषद सुपे शाखा यांच्या वतीने श्री संत सावतामाळी मदिंरा मध्ये शनिवारी द रक्तदान शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीरासाठी ससुन रूग्णालय पुणे यांच्या वतीने श्री अरुण बर्डे अधिक्षक व सहकारी टिम ने रक्त संकलन केले.
सदर शिबीरामध्ये एकुण ४५ रक्त बॉग जमा करण्यात आले. या कार्यासाठी शाखा अध्यक्ष गणेश हिरवे व अनिल हिरवे व सहकारी मित्रांचे सहकार्य लाभले.
यावेळी कार्यक्रमासाठी राज्य महिला अध्यक्ष समता परिषद मजिंरीताई धाडगे या प्रमुख पाहुणे सुपे गावच्या सरपंच स्वातीताई हिरवे सह ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.