बारामती तालुक्यातील सुपे येथील मुस्लिम बांधवांना पवित्र अशा रमजान महिन्याच्या निमित्ताने वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन व सुपे पत्रकार यांच्यावतीने सुपे येथील शाहमन्सुर बाबा दर्गा व जामा मजिंद याठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते .
याप्रसंगी सहाय्यक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख तसेच सुपे सकाळ चे जेष्ट पत्रकार जयराम सुपेकर , दिपक जाधव ,सुदाम नेवसे , सचिन पवार सहे सर्व पोलीस पत्रकार सहकारी यांच्या वतीने आज रमजानच्या वतीने फराळ तसेच अनेक प्रकारची फळे वाटप करण्यात आली .
यावेळी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे दत्तात्रय जाधव साहेब,विशाल नगरे, भाऊसाहेब शेंडगे,किसन ताडगे, सचिन दरेकर,अक्षय सिताप हे सर्व पोलीस कर्मचारी तसेच सुपे गावचे माजी उपसरपंच शफीक बागवान, ग्रामपंचायत सदस्य मुनीर डफेदास , दर्गा कमिटी सदस्य आयुब शेख , गालिब शेख , आरोग्य सेवक जमीर इनामदार राजकुमार लव्हे,सुरज शिंदे, तसेच मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते