सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कारखाना चालवत असलेल्या एचपी कंपनीच्या पेट्रोल पंपास सन २०२१-२०२२ या वर्षातील बेस्ट गुनवत्तेचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे येथील हाँटेल शेरेटन येथे हा सोहळा पार पडला. एचपी कंपनीचे विभागीय व्यवस्थापक मनीष आगरवाल यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कारखान्याचे वतीने संचालक तुषार माहुरकर संचालक जितेंद्र निगडे व पेट्रोल पंप प्रमुख डि व्ही माळशिकारे यांनी हा पुरस्कार स्विकारला. या वेळी बारामती सेल्स एरिया मँनेजर निकुंज मोल, गौरव आगरवाल व एचपी कंपनीचे पुणे रिजन डिलर उपस्थित होते. कोवीड मुळे सन २०२१ चा समारंभ होवु शकला नाही या सालात पन श्री सोमेस्वर ने प्रथम क्रमांक चे स्थान कायम ठेवलेचे गौरव उदगार निकुंज माँल यानी काढले. शेजारी नवनवीन पेट्रोल पंप होत असताना विक्री मध्ये वाढ असनारा असनारा पंप म्हनुन खास गौरव करनेत आला. लवकरच श्री सोमेश्वर कारखाना ग्राहकांचे सेवे करिता cng पंप सुरु करित असल्याची माहीती संचालक तुषार माहुरकर यांनी दिली.
याबाबत कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, कार्यक्रम संचालक राजेंद्र यादव, सर्व संचालक व सभासदांनी अभिनंदन केले आहे.